Nigdi : निगडी प्राधिकरणातील डॉगथॉन शोमध्ये चमकले दुर्मिळ जातींचे श्वान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने ‘डॉगथॉन शो’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये जगभरातील दुर्मिळ जातीच्या श्वानांना पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी रविवारी (दि. 15) गर्दी केली. शो पाहण्यासाठी आलेल्या श्वानप्रेमींना श्वानांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

लॅब्रेडॉर, गोल्डन रीट्रायव्हर, पग्स, हस्की, ल्हासा अस्पो, चीहूआहूआ, रोटवायलर, पामेरियन, बिगल्स, कॉकर स्पॅनिअल, बॉक्सर आणि भारतीय जातींच्या सुमारे 80 श्वानांनी पिंपरी-चिंचवडकरांना भुरळ घातली. सावरकर भवन प्राधिकरण येथे झालेल्या या स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, असिस्टंट गव्हर्नर सतीश आचार्य, रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या अनोख्या डॉगथॉन शोमध्ये संपूर्ण भारतातून स्पर्धक आपल्या श्वानांसह सहभागी झाले. सकाळी आठ ते साडेअकरा या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट शरीरयष्टी, चांगल्या सवयी या तीन प्रकारांमध्ये बक्षीस देण्यात आले. श्वानांवर आधारित असणारी ही स्पर्धा शहरवासीयांसाठी रोटरी क्लब मागील काही वर्षांपासून आयोजित करीत आहे. कार्यक्रमात डॉगवॉक, स्प्लॅश पूल, टॅलेंट शो, फॅशन शो, लीश वॉक यांसारख्या श्वानांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.