Nigdi : पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करत टोळक्याची दहशत

The terror of the mob swearing out of prejudice

एमपीसी न्यूज – तरुणासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने त्याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत रिक्षाची काच फोडली. तसेच तलवारी आणि कोयते दाखवून दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

विवेक टेकाळे (वय अंदाजे 25) अक्षय बनसोडे (वय अंदाजे 20), अश्रुबा बगाडे (वय अंदाजे 22), बबल्या गायकवाड (वय 24, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी देवमा मरीप्पा धोत्रे (वय 28, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची फिर्यादी यांच्या भाच्यासोबत मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडणे झाली होती. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आरडओरडा करून फिर्यादी व इतर लोकांना शिवीगाळ केली.

कोयते दाखवून फिर्यादी आणि परिसरातील एकाची रिक्षाची काच फोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले. फिर्यादी यांना हाताने ढकलून मारहाण करत शिवीगाळ केली.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.