Nigdi : कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना निगडी येथे घडली.

निलेश धोंडिबा सोरटे (वय 37, रा. पेठ क्रमांक 27, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात ते गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान सोरटे यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एक लाख 43 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.