Nigadi : मोटारीतून आलेल्या तिघांनी सराफी पेढीतून पावणे तीन लाखांचे चांदी चोरली

एमपीसी न्यूज – मोटारीतून आलेल्या तीन चोरट्यांनी सराफी पेढीचे शटर उचकटून दुकानातून सुमारे दोन लाख 78 हजार 540 रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास अंबिका ज्वेलर्स विठ्ठलवाडी आकुर्डी येथे घडली.

अभिषेक रमेश सोलंकी (वय 34, रा. विठ्ठलवाडी आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे तवेरा मोटारीतून (एमएच 12 / जे यु 9380) आले. चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटले.

त्याद्वारे आत प्रवेश करून दुकानाचे काऊंटर ड्रॉवर आणि रॅकमध्ये ठेवलेले दोन लाख 78 हजार 540 रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.