BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : प्राधिकरण परिसरातील कचरा दोन दिवसात उचला, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू

नगरसेवक अमित गावडे यांची 'अ' प्रभाग अधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मधील कचरा मागील काही दिवसांपासून उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा नियमितपणे उचलावा. अशी मागणी शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी अ प्रभाग अधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच कचरा वेळीच उचलला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

‘अ’ प्रभाग अधिका-यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित गावडे, उपशहरप्रमुख अमोल निकम, महिला विधानसभा संघटिका सरिता साने, भाविक देशमुख, बाळासाहेब वाल्हेकर, शैला निकम, शरद जगदाळे, कामिनी मिश्रा आदी उपस्थित होते.

  • गावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रभाग क्रमांक 15 मधील निगडी, प्राधिकरण परिसरातील कचरा मागील काही दिवसांपासून नियमितपणे उचलला जात नाही. रस्त्यांची साफसफाई केली जात नाही. प्राधिकरणात सर्वत्र कच-याचे ढीग साचले आहेत. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा उचलणा-या गाड्यांची वेळ निश्चित नसून त्या नियमित येत नाहीत.

पावसामुळे कचरा ओला झाला असून त्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कचरा उचलण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. येत्या दोन दिवसात कच-याचा प्रश्न मार्गी लावावा. रस्त्यांची नियमितपणे सफाई करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

  • ‘अ’ प्रभाग समितीची आज (मंगळवारी) बैठक झाली. अमित गावडे यांनी दिलेल्या निवेदनाचे आणि निगडी प्राधिकरण परिसरातील कच-याच्या प्रश्नाचे तीव्र पडसाद या बैठकीत उमटले. कच-याच्या प्रश्नावर प्रभाग समितीची बैठक तहकूब करण्यात आली.
HB_POST_END_FTR-A2

.