Nigdi : दुचाकीवरील चोरट्यांनी पादचारी महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी पादचारी महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 21) सकाळी अकराच्या सुमारास यमुनानगर निगडी येथे घडली.

लुबना बक्षीर शेख (वय 35, रा ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख शनिवारी सकाळी यमुनानगर येथून पायी रस्त्याने चालत घरी जात होत्या. यमुनानगर येथील अजंठा गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी येथे आल्या असता दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.