Nigdi: राष्ट्रवादीकडे कोणताच मुद्दा नाही; मनोमिलनावरील टीकेला खासदार बारणे यांचे उत्तर 

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नाही. ज्यांनी आरोप केले. त्यांना राष्ट्रवादीने बाहुले केले आहे. राष्ट्रवादीला बोलायला जागा नाही, अशी टीका मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. मनोमिलनावर राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला बारणे यांनी प्रत्युत्तर दिले. 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील दहा वर्षाचे हाडवैर संपून सोमवारी (दि. 8)मनोमिलन झाले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन त्यावर पलटवार केला होता.

शिवसेना खासदारांनी पंतप्रधान आवाज योजनेपासून विविध सार्वजनिक विकास कामातील भ्रष्टाचाराबाबत भाजपवर आरोप केले होते. आरोप घरचे नव्हते. जनतेच्या पैशातून विकासकामात झालेल्या गैरव्यहाराचे आरोप होते. तसेच भाजप आमदारांवर देखील वैयक्तिक आरोप केले होते. मग आता या भ्रष्टाचाराचे मनोमिलन झाले का? तसेच लाज कशी वाटत नाही, असा सवाल केला होता. आरोप खासगी, घरगुती नव्हते. जनतेच्या पैशातून झालेल्या विकासकांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आरोप होते. ते तुम्ही माघेच घेऊ शकत नाही, असेही राष्ट्रवादीचे नेते म्हणाले होते.

याबाबत विचारले असता बारणे म्हणाले, ”ज्यांनी आरोप केले. त्यांना राष्ट्रवादीने बाहुले केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समोर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केले आहे. त्यांना बोलायची जागा नाही. त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही. गेली पाच वर्ष पिंपरी-चिंचवड शहराची केलेली लूट, अनेक चुकीच्या पद्धतीने घेतलेले निर्णय. त्यांच्या कारभार शहरातील जनतेने पाहिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ लोकसभा मतदारासंघातील जनतेने राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर लोटले आहे. त्यामुळे ते उसने आव आणून बोलत आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.