Nigdi : देशात येत्या तीन वर्षात क्रांती घडणार -सु. ग. शेवडे

एमपीसी न्यूज – शाहिनबागेतील आंदोलनाला पैसा पुरविला जात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, देशात येत्या तीन वर्षात क्रांती घडणार आहे. कारण, दिल्लीत राम आणि हनुमानचे राज्य आहे. आपण हिंदू आहोत याचा अभिमान बाळगा, हिंदुत्वच देशावर आलेला वाईट काळ थोपवू शकतो, असे विचार सु. ग. शेवडे यांनी व्यक्त केले. नॉस्ट्रॅडेमसने व्यक्त केलेले भाकित येत्या तीन वर्षांत पूर्णत्वास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समर्थ प्रॉडक्शन प्रस्तुत आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित स्वर गंधर्व संगीत महोत्सवात शनिवारी सकाळच्या सत्रात शेवडे यांचे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर व्याख्यान झाले.

राष्ट्रावादाचा पुरस्कार करून शेवडे म्हणाले, आम्ही हिंदू आहोत, हे राष्ट्र आमचे आहे. हिंदूस्थानापासून जे तोडले गेले तेही आमचेच आहे. केवळ स्वार्थापोटी देशाचे तुकडे केले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदुत्व तोडण्याचाच प्रयत्न झाला. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही हिंदू आहोत, हे राष्ट्र आमचे आहे. स्वार्थापोटी देशाचे तुकडे केले गेले आणि 70 वर्षात जी पापं केली गेली त्याची फळ आज आपण भोगत आहोत. 1990 मध्ये काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. हिंदुत्वच देशावर आलेल्या संकटाला थोपवू शकतो.

हिंदू हा धर्म आहे इतर पंथ आहेत. वेद ईश्वरी आहेत ते मानवनिर्मित नाहीत. वेदांना मानतो, मूर्तीचा अपमान करीत नाही, पुनर्जन्मावर ज्याचा विश्वास आहे तो हिंदू. हिंदुत्वाबाबत विनोबा भावे यांनी केलेली व्याख्या शेवडे यांनी सविस्तरपणे सांगितल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांनी प्राणाची आहुती दिली. अनेकांना फासावर लटकाविले गेले पण त्यांना इतिहास आपल्याला शिकविला गेला नाही, अशी टीका करुन शेवडे म्हणाले. हिंदू बलवान झाले नाहीत तर 1990 मध्ये काश्मीरमध्ये जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता आहे. हिंदुत्वावर येऊ पाहणार्‍या संकटाविरुद्ध एकजुटीनेच लढावे लागेल. या लढाईत मी सर्वात पुढे असेन.

शाहिनबागेतील आंदोलनाला पैसा पुरविला जात असल्याचा आरोप करून देशात येत्या तीन वर्षात क्रांती घडणार आहे. कारण, दिल्लीत राम आणि हनुमानाचे राज्य असल्याचे ते म्हणाले. आपण हिंदू आहोत याचा अभिमान बाळगा, हिंदुत्वच देशावर आलेला वाईट काळ थोपवू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रकाश क्षीरसागर यांनी शेवडे यांचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.