Nigdi : बँकेची गोपनीय माहिती घेऊन हजारोंची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले होते. त्याचा बँकेकडून परतावा मिळाला आहे. असे सांगत खातेदाराकडून बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे खात्यावरून 20 हजार रुपये काढून घेतले. ही घटना बजाज ऑटो कंपनी आकुर्डी येथे शनिवारी (दि. 5) घडली.

प्रवीण दत्तात्रय गायकवाड (वय 39, रा. कुणाल प्लाझा, चिंचवड स्टेशन) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बजाज ऑटो कंपनीमध्ये काम करतात. ते शनिवारी कंपनीमध्ये कामाला गेले असता अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने सांगितले की, ‘तुमचे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार ब्लॉक झाले आहे. त्याचा बँकेने परतावा पाठवला आहे. त्यासाठी डेबिट कार्डचा नंबर द्यावा लागेल.’ यावरून प्रवीण यांनी फोनवरील व्यक्तीला त्यांच्या डेबिट कार्डचा नंबर दिला. त्यानंतर फोनवरील व्यक्तीने प्रवीण यांच्या खात्यातून 20 हजार रुपये काढून घेतले. यावरून फोनवरील व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.