Nigdi : रेफ्रिजरेटरचे दुकान फोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – रेफ्रिजरेटरच्या दुकानाचा छताचा पत्रा फोडून दुकानातून रोख रक्कम आणि साहित्य असा एकूण 31 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी दहाच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे उघडकीस आली.

इकरार अहमद शेख (वय 45, रा. राहुलनगर निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे ओटास्कीम येथील अंकुश चौकात क्वालिटी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर हे दुकान आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास शेख यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा सिमेंटचा पत्रा फोडून दुकानात प्रवेश केला.

दुकानातील लाकडी ड्रॉवरचे लाॅक तोडून दहा हजार रुपयांची रोकड आणि इतर साहित्य असा एकूण 31 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.