Nigdi : पती विरोधात तक्रार देणा-या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पतीने पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली. या रागातून पतीने पुन्हा पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 24) निगडी प्राधिकरण येथे घडली.

नाजनीन खालिद इनामदार (वय 36, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार खालिद मोहिद्दीन इनामदार (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजनीन यांचा पती खालिद याने त्यांना लाकडी दांडक्याने आणि हाताने मारहाण केली. यामध्ये नाजनीन जखमी झाल्या. याबाबत त्यांनी खालिदविरोधात निगडी पोलिसात तक्रार दिली. पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून खालिद याने पुन्हा नाजनीन यांना पुन्हा मारहाण केली.

यामध्ये नाजनीन यांच्या डोक्यावर, हातावर, पायावर आणि बरगडीवर मार लागला. नाजनीन यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत त्यांनी पुन्हा एकदा पतीविरोधात गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.