Nigdi : निगडी, पिंपरी, तळेगाव परिसरात तीन वाहनांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – निगडी, पिंपरी आणि तळेगाव दाभाडे परिसरातून तीन वाहने चोरीस गेली. निगडी परिसरातून रिक्षा तर पिंपरी आणि तळेगाव दाभाडे परिसरातून मोटारसायकल चोरून नेल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रामदास काशिराम सोंडकर (वय 61, .रा विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी रामदास रिक्षाचालक आहेत. त्यांनी त्यांची एमएच 14 / सी यु 0701 ही तीन चाकी रिक्षा शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विठ्ठलवाडी येथील सावित्री कुंज इमारतीच्या मागील बाजूस पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी रिक्षा चोरून नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

जितेंद्र जगन्नाथ महामुनी (वय 51, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी जितेंद्र यांनी 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांची केटीएम कंपनीची एम एच 14 / एफ 87 13 ही एक लाख रुपये किंमतीची मोटारसायकल त्यांच्या घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लाॅक तोडून चोरून नेली.

सतीश वसंत गोरे (वय 64, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सतीश यांनी गुरुवारी (दि. 31) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची हिरो होंडा पॅशन मोटरसायकल (एम एच 14 / बी क्यू 1061) त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव-दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.