BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – बोलत थांबलेल्या दोन मित्रांना तिघांनी मिळून विनाकारण मारहाण केली. यामध्ये दोन्ही तरुण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री नऊच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॅनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समीम जमीर शेख (वय 30, रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख आणि त्यांचा मित्र इरशाद हुसेन हे दोघेजण त्यांच्या घराजवळ शनिवारी रात्री नऊच्या सुमारास बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी शेख यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच रस्त्यावर पडलेल्या दगड फेकून मारले. यामध्ये शेख यांच्या डोक्याला, हाताला, पायाला, पाठीला गंभीर इजा झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी त्यांचा मित्र हुसेन आला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3