BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून चार वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – दारू पीत बसलेल्या दारुड्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. आपण दारू पित आहोत, ही माहिती आजूबाजूच्या वाहन चालकांनी दिली, असा संशय घेत पाच जणांच्या टोळक्याने आसपासच्या चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना चिंचवड मधील रामनगर जवळ बुधवारी (दि. 10) रात्री घडली.

अमित प्रकाश बाबर (रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर झोंबाडे, अभिषेक घनघाव, सुप्रीम काळे, अजय बारस्कर, दीपक गिरी (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रामनगरजवळ पाच जण रस्त्यावर दारू पीत बसले होते. ही माहिती पोलिसांना मिळाली. निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून दारुडे तिथून पळून गेले. दारू पीत असल्याची माहिती पोलिसांना तिथल्याच आजूबाजूच्या वाहनचालकांनी दिली, असा संशय घेत ते दारुडे पुन्हा घटनास्थळी आले. त्यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या चार वाहनांची तोडफोड केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3