Nigdi : प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवणे सहज शक्य – उत्तम बोडके

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात व्याख्यान

एमपीसी न्यूज- ठराविक नोकरीच्या मागे लागून तरुण सरकारी नोकरीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे करियरच्या सुवर्णसंधी गमावतात. यासाठी नियमित अभ्यास करावा. योग्य पद्धतीने प्रवेश आणि पात्रता परिक्षा पास होऊन सरकारी सेवेत रुजू व्हावे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार उच्चशिक्षण घेऊन बढत्या मिळवित उत्तम पद्धतीने करीयर करावे, असे आवाहन रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उत्तम बोडके यांनी केले.

निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्पर्धा परीक्षा विभाग आणि शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मराठी तरुणांसाठी शासकीय नोकरी या विषयातील मार्गदर्शक व्याख्यान व कार्यशाळेत ते बोलत होते. मंगळवारी (दि.26) झालेल्या कार्यक्रमाला मंडळाचे विनोद बन्सल, भास्कर रिकामे, रमेश नायर, चंद्रशेखर तिवारी, संजय पाचपुते, उल्हास कुलकर्णी उपस्थित होते. या व्याख्यानास तरुणांसह पालकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.

“सध्या रेल्वेमध्ये एक लाख तीस हजार विविध प्रकारची पदे भरली जाणार आहेत. रेल्वेप्रमाणे अलिकडच्या काळात केंद्र सरकारच्या सर्वच विभागात लहान मोठ्या प्रमाणात सर्व पदांची भरती सुरु आहे. यापुढेही सुरुच राहणार आहे. यासाठी होणा-या प्रवेशपरिक्षेला बसणे. त्यासाठी आवश्यक असणारे फॉर्म भरणे आवश्यक आहे” असे उत्तम बोडके म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

शिवसेवा संस्थेचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच ग्रामविकास व तरुणांचे ध्येयधोरणे याबाबतही मार्गदर्शन त्यांनी केले. या मार्गदर्शन व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षेची नवीन दिशा मिळाली. या व्याख्यानानंतर अनेक तरुणांनी शासकीय नोकरीत यश मिळणारच, असा निर्धारही व्यक्त केला.

मराठी तरुण शासकीय नोकरीत जास्तीत जास्त पोहोचले पाहिजेत हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्यासाठी स्पर्धा परीक्षांची असणारी तयारी, स्पर्धा परीक्षांचे नियोजन स्पर्धा परीक्षांचे फॉर्म आदींबाबतची इत्यंभूत माहिती या मार्गदर्शन व्याख्यानामध्ये देण्यात आली. स्पर्धा परीक्षा आणि शासकीय नोकरीमध्ये खासकरून रेल्वे विभागात मराठी तरुणांचा टक्का कमी होते. या दृष्टीनेच या मार्गदर्शन व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदीप पाटील यांनी केली. सूत्रसंचालन नेहा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सावरकर मंडळाचे कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1