-MPC-TOP-MOST-BANNER-I

Nigdi : पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस; नागरिकांचा खोळंबा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, निगडी, भोसरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस पडल्याने कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मंगळवारी (दि. 22) शहरात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार, सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळपासून पावसाची दाट शक्यता होती. दुपारनंतर पावसाने आकुर्डी, निगडी, देहूरोड, भोसरी, मोशी परिसरात चांगलेच थैमान घातले. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

पावसाची शक्यता असताना देखील सकाळपासून पावसाने दडी मारल्याने नागरिक कामासाठी घराबाहेर पडले. दुपारनंतर अचानक पाऊस सुरु झाल्यानंतर नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.