Nigdi : भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम करण्यासाठी चौकातून जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीतील हा बदल पुढील काही दिवस काम पूर्ण होईपर्यंत असणार आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिला आहे.

# पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या वाहनांसाठी
भक्ती शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्ट नगर मधून पुणे-मुंबई महामार्गाकडे जातील

# पुण्याकडून त्रिवेणीनगरकडे जाणा-या वाहनांसाठी
भक्ती शक्ती चौकातून डाव्या बाजूला वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून निगडी नाक्यावरून यु टर्न घेऊन पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जातील

# मुंबईकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांसाठी
मुंबईकडून येणारी वाहने पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौकातून उजवीकडे वळून दुर्गा चौकाकडे जातील. दुर्गा चौकातून उजवीकडे टिळक चौकाकडे अथवा दुर्गा चौकातून सरळ टेल्को रोडने थरमॅक्स चौकातून खंडोबामाळ येथून मुंबई पुणे महामार्गाकडे जातील

# मुंबईकडून भेळ चौक, चिंचवडकडे जाणा-या वाहनांसाठी
मुंबईकडून येणार वाहने पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून चिकन चौक, दुर्गाचौक, टिळक चौक मार्गे भेळ चौक, चिंचवडकडे जातील

# संभाजी चौकातून मुंबईकडे जाणा-या वाहनांसाठी
संभाजी चौकातून येणारी वाहने अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून मुंबई पुणे रस्त्यावर जातील

# संभाजी चौकातून त्रिवेणीनगरकडे जाणा-या वाहनांसाठी
संभाजी चौकाकडून येणारी वाहने अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्टनगर मधून निगडी नाका येथून यु टर्न घेऊन पीएमपीएमएल बस डेपोमधून डावीकडे वळून त्रिवेणीनगरकडे जातील. अथवा संभाजी चौकातून भेळ चौक, टिळक चौक मार्गे त्रिवेणीनगरकडे जातील

# त्रिवेणीनगरकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांसाठी
त्रिवेणीनगरकडून पुण्याकडे जाणारी वाहने टिळक चौकमार्गे अथवा थरमॅक्स चौक, खंडोबा माळ चौकमार्गे पुण्याकडे जातील

# त्रिवेणीनगरकडून संभाजी चौक बिजलीनगरकडे जाणा-या वाहनांसाठी
त्रिवेणीनगर चौकातून बिलजीनगरकडे जाणारी वाहने दुर्गा चौक, टिळक चौक मार्गे भेळ चौकातून बिजलीनगरकडे जातील

# त्रिवेणीनगरकडून मुंबईकडे जाणा-या वाहनांसाठी
त्रिवेणीनगरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक टिळक चौक, भक्ती शक्ती चौकातून डावीकडे वळून अप्पूघरमार्गे ट्रान्सपोर्ट नगर मधून मुख्य रस्त्यावरून मुंबईकडे जातील. अथवा टिळक चौकातून भेळ चौक मार्गे, रावेत मार्गे मुंबईकडे जातील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like