-MPC-TOP-MOST-BANNER-I

Nigdi : भरधाव वेगातील ट्रेलरची दुचाकीला धडक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात मंगळवारी (दि. 17) रात्री एकच्या सुमारास निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात झाला.

अमित त्रिलोकचंद शर्मा (वय 26, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यासिन मुहम्मद खान (वय 35, रा. बासखोरकला, ता. रुधवली, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) या ट्रेलरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा मंगळवारी रात्री एकच्या सुमारास निगडी येथून दुचाकीवरून (एम एच 14 / जी पी 7185) घरी जात होते. ते भक्ती शक्ती चौकात आले असता भरधाव वेगात आलेल्या टेलरने (एम एच 43 / बी बी 7865) शर्मा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.