Nigdi : दरोडा, वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींना बारा तासात ठोकल्या बेड्या; निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – लूटमार करून पाच वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना दरोडा टाकणा-या आठ जणांना निगडी पोलिसांनी बारा तासात बेड्या ठोकल्या आहेत.

मनोज पोपट खरात (वय 28), संतोष सिद्धू पवार (वय 23), करण ज्ञानदेव तिरकर (वय 19), प्रवीण सोमनाथ कांबळे (वय 19), सुनील मनोहर डोंगरे (वय 22), संग्राम विलास बागुल (वय 25), शुभम गोरखनाथ भिंगारदिवे (वय 23), अनिकेत चंद्रकांत भोसले (वय 22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास आरोपींनी अजंठानगर, कुंदन हुंदाई शोरूमच्या मागे येऊन लूटमार करून एक कार आणि चार दुचाकींची तोडफोड केली. तलवारी आणि कोयत्याने तोडफोड करून आरोपींनी सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी कारमधून निघून गेले.

घटनेची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानुसार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीने आरोपींना संभाजीनगर येथील बहिणाबाई सर्प उद्यान येथील एका जुन्या पडीक बंगल्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पडीक बंगल्यात लपून बसलेल्या आरोपींसह एक कार, तलवार, कोयता असे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, अन्सार शेख, प्रशांत आरदवाड, उपनिरीक्षक महेंद्र आहेर, संदीप ओव्हाळ, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, मछिंद्र घनवट, सतीश ढोले, विलास केकाण, रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंजगे, अमोल साळुंके, रमेश सूर्यवंशी, अनंता ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.