Nigdi : बस प्रवासात दोन लाख 35 हजारांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – स्वारगेट ते निगडी या दरम्यान पीएमपी(Nigdi) बसने प्रवास करत असताना महिलेच्या पर्स मधून दोन लाख 35 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली असून याप्रकरणी 2 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दागिने चोरीला गेलेल्या महिलेच्या सुनेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Nigdi)यांच्या सासू 4 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजता स्वारगेट येथून निगडी येथे पीएमपी बसने आल्या. बस प्रवासात अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या सासूच्या पर्समध्ये ठेवलेले दोन लाख 35 हजार रुपये किमतीचे दागिने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.