Nigdi : कारचालकाला मारहाण करून लुटणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – एका कारचालकाला मारहाण करून चार जणांनी लुटले. हा प्रकार सोमवारी (दि. 27) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स चौकात हॉटेल नवमी समोर घडला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गणेश विक्रम गोरे, श्रीकांत गोविंद शिंदे (दोघे रा. रामनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. यांच्यासह रजनीकांत गोविंद शिंदे, विराट (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राकेश मनिराम यादव (वय 27, रा. मोशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास फिर्यादी यादव हे थरमॅक्स चौकाजवळ हॉटेल नवमीजवळ त्यांची कार पार्किंगमधून बाहेर काढत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे, कारच्या खाली ये’ असे आरोपी फिर्यादी यांना म्हणाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

त्यांच्या गळ्यातील चांदीची चेन आणि रोख रक्कम असा एकूण पाच हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.