Nigdi : एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत त्यांना बेड्या; खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – मागील एक वर्षापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने निगडी येथे केली.

लखन ऊर्फ विकास कैलास जाधव (वय 22, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी), नितीन महावीर चंदनशिवे (वय 23, रा. सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन आणि नितीन हे दोघे पिंपरी-चिंचवड पोलिसांना मागील एक वर्षापासून गुंगारा देत होते. ते दोघे चिकन चौक ओटा स्कीम येथे आले असल्याची माहिती पोलीस नाईक शैलेश सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघेही सराईत आरोपी असून मागील एक वर्षापासून फरार असल्याचे निष्पन्न झाले.

लखन सातव याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. नितीन चंदनशिवे याच्यावर सहा गुन्हे दाखल असून निगडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात तो फरार होता.

  • ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, उमेश पुलगम, शैलेश सूर्वे, किरण काटकर, आशिष बोडके, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.