Nigdi : राजकारणात सुरुवात करताना इकडे-तिकडे होत असते; उदयनराजेंनी केली पार्थ पवार यांची पाठराखण

एमपीसी न्यूज – राजकारणात सुरुवात करत असताना इकडे-तिकडे होत असते. वरिष्ठांनी सावरून घायचे काम करावे लागते. वडीलधारी मंडळीनी सांभाळून घ्यावे. सुरवातीला चुकल्यावर ट्रोल करणे चुकीचे आहे, असे सांगत छत्रपती खासदार उदयनराजे महाराज भोसले यांनी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची पाठराखण केली. तसेच भविष्यात पार्थ माझ्यासोबत खासदार असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय डेमोक्रॅटिक – कवाडे, गवई, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी ( दि. 13) निगडी, प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या मैदानावार आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अडखळत केलेले पहिले भाषण, लोकलने उलट्या दिशेने केलेला प्रवास, विनाकारण पळापळ आणि मावळमधून निवडणूक का लढवत आहात ? या प्रश्नाला दिलेले अजब उत्तर अशा विविध कारणावरून पार्थ यांना नेटिझन्सकडून ट्रोल केले जात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like