Nigdi : कार्यक्रमाच्या हॉलमधून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – कार्यक्रमाच्या हॉलमधून एका महिलेच्या पर्समधून तीन लाख 68 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास यमुनानगर येथील सीझन बँक्वेट हॉल येथे घडली.

अभिजीत चंद्रकांत गिजे (वय 31, रा. कळव, जि. ठाणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित यांच्या आई मंदा चंद्रकांत गिजे या एका कार्यक्रमासाठी यमुनानगर येथील सिझन बँक्वेट हॉल येथे आल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरून नेली. पर्समध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.