Nigdi : प्राधिकरण कार्यालयाच्या सीमाभिंतीलगत कचऱ्याचे ढीग

एमपीसी न्यूज- वाजत गाजत सुरु केलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असतानाच आता चक्क निगडी येथे प्राधिकरण कार्यालयाच्या सीमाभिंतीला लागूनच रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचलेला दिसून येत आहे. झाडाचा पालापाचोळा सर्वत्र पसरलेला आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील शहरात येणार असून याच कार्यालयात त्यांची बैठक होणार आहे. सरकारी कार्यालयाच्या परिसरातच कचरा साठलेला असताना शहराच्या इतर भागातील परिस्थितीबाबत काहीच बोलायला नको, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.