Nigdi: सिद्धीविनायक नगरीतील नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांनाही आठवडे बाजाराचा लाभ -सुनील शेळके

एमपीसी न्यूज – सिद्धीविनायक नगरी येथे शेतकरी आठवडे बाजार सुरू केल्यामुळे परिसरातील नागरिकांबरोबरच मावळातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल, असे मत तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

निगडीच्या सिद्धीविनायक नगरी भागात शेळके यांच्या पुढाकाराने रविवारी शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. पहिल्या आठवडे बाजाराचे उद्धाटन शेळके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

निगडी येथील दत्तनगर, आशीर्वाद कॉलनी, श्री विहार, समर्थ नगरी, सिद्धिविनायक नगरी या भागातील नागरिकांची शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याची खूप दिवसांपासूनची मागणी होती. त्याला प्रतिसाद देत शेळके यांनी पुढाकार घेऊन सिद्धीविनायकनगरी येथील गणपती मंदिरासमोर दर रविवारी शेतकरी आठवडे बाजार सुरू केला आहे.

दत्तनगर, आशीर्वाद कॉलनी, श्री विहार, समर्थ नगरी, सिद्धिविनायक नगरी या विभागातील नागरिक गेले अनेक वर्षे आठवडे बाजार पासून वंचित होते. भाजीपाला आणि फळे खरेदीसाठी दूर जावे लागत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार हा शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळण्याबरोबरच या भागातील रहिवाशांना ताजा भाजीपाला, फळे तसेच सेंद्रीय फळभाज्या मिळू शकतील. नागरिक व शेतकरी दोघांनीही या आठवडे बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेळके यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.