Nigdi: वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज – वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका दलाल महिलेला (Nigdi)अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 3) दुपारी निगडी येथे करण्यात आली.

याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार संगीता जाधव यांनी निगडी पोलीस (Nigdi)ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune: शिवसेनेने स्व. वसंतदादां विषयीचे ऋणानुबंध लक्षात घेता, ‘सांगली’ ची जागा मोठ्या मनाने काँग्रेस’ला सोडावी – गोपाळ तिवारी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर दलाल महिलेने आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने कारवाई करून महिलेला अटक केली. तिच्या ताब्यातील एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.