Nigdi : नळजोडणी घेण्याच्या कारणावरून महिलेला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज- नळजोडणी घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका महिलेला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना ओटास्कीम, निगडी येथे घडली.

भीमाबाई राजू गायकवाड (वय 36, रा. संग्रामनगर, ओटास्कीम, निगडी) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. 10) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजू कांबळे, गणेश शिंदे, बालाजी सूर्यवंशी (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 8) दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपी विजू कांबळे याने फिर्यादी यांच्या नळजोडास आणखी एक स्वतःकरिता नळजोड घेतला. यावेळी आरोपी विजू कांबळे आणि फिर्यादी भीमाबाई यांच्यात भांडण झाले. त्यावेळी कांबळे याने भीमाबाई यांना दगडाने मारहाण केली. तसेच भांडण सुरू असताना आरोपींनी त्यांना मदत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.