Nigdi : बस प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना (Nigdi ) सत्तर वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पवळे ब्रिज निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉप येथे घडली.

 

Dehugaon : माळीनगर मध्ये 68 हजारांची घरफोडी

 

याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पवळे ब्रिज येथील बस स्टॉप वरून बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या हातातील पंचवीस हजार रुपये (Nigdi ) किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.