Nigdi : पैशासाठी विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेरहून 80 लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. हा प्रकार ऑगस्ट 2012 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती महेश सूर्यवंशी (वय 33), सासू सुगंदा सुर्यवंशी (वय 55), सासरा विठोबा सूर्यवंशी (62, सर्व रा. यमुनानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेकडे व्यवसाय करण्यासाठी 80 लाख रुपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.