Nigdi: भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम आढावा घेऊन सुरु करावे -सुमन पवळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम कोरोनामुळे महिन्याभरापासून बंद आहे. राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार पुलाचे काम करता येईल काय़?, याचा आढावा घ्यावा. काम करता येत असल्यास तत्काळ सुरु करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन मेल केले आहे. त्यात नगरसेविका पवळे यांनी म्हटले आहे की, निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे पुलाचे काम मागील एक ते दीड महिन्यापासून बंद आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे पुलाचे काम तत्काळ पुर्ण करणे आवश्यक आहे.

राज्य सरकारने लॉकडाउन तीनमध्ये काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत संपुर्ण बाबीचा विचार करुन पुलाचे काम चालू करता येईल का याचा आढावा घ्यावा. शक्य असल्यास संबंधित ठेकेदाराला तत्काळ सुचना द्याव्यात आणि पुलाचे काम सुरु करावे, अशी विनंती नगरसेविका पवळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.