Nigdi : गुन्हा दाखल करुन पोलीस प्रशासनाकडून प्रशिक्षणार्थी मुलींचे खच्चीकरण – तेजस्विनी कदम

एमपीसी न्यूज – विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा वाहिनी प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी मुलींवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे भाजपच्या युवती अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी म्हटले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, विश्व हिंदु परिषदेच्यावतीने दुर्गा वाहिनी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमांतून मुली स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घेत आहेत. या शिबिराच्या शोभायात्रेमध्ये मुलींच्या हातामध्ये प्रात्यक्षिकांसाठी हत्यारे देण्यात आली होती.

यावरुन निगडी पोलिसांनी आयोजकांसह मुलींवर देखील गुन्हा दाखल केला आहे. आज आपण युवतींना सक्षमीकरण आणि स्वरक्षणाचे धडे देतो. आयुष्यात सामोरे जाव्या लागणा-या समस्यांचे प्रत्ययकारी दर्शन या शिबिराच्या माध्यमांतून केले जात असताना युवतींना सक्षमीकरणासाठी संरक्षण ही एक काळाची गरज मानली जाते. आपल्या देशाला विकासाच्या दृष्टीकडे नेत असताना युवतींचे स्वरंक्षण महत्वाचा घटक आहे. पोलीस प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करुन युवतींचे खच्चीकरण करणे चुकीचे आहे असे कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.