Nigdi : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – निरखून पाहिल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेनऊच्या सुमारास संजयनगर, निगडी येथे घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

राहुल यल्लाप्पा सोनकांबळे (वय 23), विशाल सतीश अडसुळे (वय 24, दोघे रा. संजयनगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी योगेश निर्गुणा कांबळे (वय 29) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संजय नगर येथे त्यांच्या मित्रासोबत रिक्षा संदर्भात बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपी राहुल याने ‘तू आमच्याकडे निरखून का पाहतोस?’ असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोणत्यातरी कठीण वस्तूने योगेश यांच्या डोळ्याच्या खाली मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.