Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी साडेबाराच्या सुमारास स्पाईन रोड चिखली येथे घडली.

बाळासाहेब अंकुश कोंडलकर (वय 30, रा. नागेश्वर हायस्कुल जवळ, धर्मराजनगर, पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज खंडागळे व त्याचे दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब आणि मनोज यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. बाळासाहेब गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाटील नगर येथील घरी जात होते. त्यावेळी बाळासाहेब यांच्यासोबत त्यांचा कार चालक योगेश महाडिक सोबत होता. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मनोज याने त्यांच्या दोन साथीदारांना बरोबर घेऊन स्पाईन रोड चिखली रोडवरील घरकुल सोसायटी समोरील सार्वजनिक रोडवर बाळासाहेब यांची कार थांबवली. सर्व आरोपींनी मिळून बाळासाहेब यांना कारच्या बाहेर ओढले. मनोज याने बाळासाहेब यांच्यावर कोयत्याने वार केले. तर अन्य दोन साथीदारांनी मिळून रॉडने मारहाण केली. यामध्ये बाळासाहेब गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.