Nigdi : नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरीचे अमिश दाखवून सहा जणांनी तरुणाकडून पैसे घेतले. त्याला बनावट ऑफर लेटर देऊन त्याची फसवणूक केली. ही घटना 15 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत आकुर्डी मधील गणेश व्हिजन येथील शॉप नंबर 313 आणि ऑरोस कंपनी प्राधिकरण येथे घडली.

अक्षय नितीन इंगळे (वय 24, रा. धारावी टी जंक्शन सायन बांद्रा लिंक रोड, मुंबई) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विकास बाळासाहेब कदम, विकास बाळासाहेब निंबाळकर, सुहास शिवाजीराव पाटील, कैलास सूर्यवंशी, विवेक सिंग आणि एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि त्याचा मित्र दोघेजण नोकरीच्या शोधात होते. त्यांना गणेश व्हिजन येथील शॉप नंबर 313 मधील आरोपींनी नोकरीचे अमिश दाखवले. नोकरीसाठी त्यांच्याकडून 81 हजार 200 रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी अक्षय आणि त्यांच्या मित्राचा कॉन्फरन्स कॉलवरून मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर आरोपींनी अक्षय आणि त्यांच्या मित्राला प्राधिकरण निगडी येथील ऑरोस कंपनीचे ऑफर लेटर दिले. मात्र, दिलेल्या ऑफर लेटरवरून त्यांना नोकरी मिळाली नाही. यावरून अक्षय यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.