_MPC_DIR_MPU_III

Nigdi crime News : बलात्कार करून महिलेला दुचाकीवरून ढकलून देणाऱ्या आरोपीवर गुन्हा

ही घटना डिसेंबर 2018 पासून 29 जुलै 2020 या कालावधीत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडली.

एमपीसी न्यूज – पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन महिलेवर वारंवार बलात्कार केला. तसेच दुचाकीवरून जात असताना तिला ढकलून देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2018 पासून 29 जुलै 2020 या कालावधीत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडली.

_MPC_DIR_MPU_IV

याप्रकरणी 40 वर्षीय पीडित महिलेने सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिथून हा गुन्हा वर्ग करून पिंपरी-चिंचवड मधील निगडी पोलिसांकडे पाठवण्यात आला.

त्यानुसार पोलिसांनी नागेश गुरुनाथ नंदरागे (रा. कलावती नगर, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश याने पीडित महिलेला गंगानगर -आकुर्डी, हिंजवडी, दहिटणे, अक्कलकोट रोड- सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर येथील वेगवेगळ्या लॉजवर नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबध ठेवले.

त्यानंतर 27 जुलै रोजी सोलापूर शहरात दुचाकीवरून जात असताना नागेश याने पीडित महिलेला दुचाकीवरून धक्का देऊन खाली पाडले. यामध्ये महिलेच्या डोक्याला, तोंडाला, कमरेला गंभीर दुखापत झाली.

याबाबत पीडित महिलेने सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बलात्काराची घटना पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरु झाल्याने हा गुन्हा सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी निगडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.