Nigdi : निगडी पोलीस ठाण्यात अभ्यागत कक्षाचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाण्यात सुसज्ज अभ्यागत कक्षाचे उदघाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 19) निगडी पोलीस स्टेशन येथे पार पडला.

कार्यक्रमासाठी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून या अभ्यागत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, तसेच इतर कामानिमित्त येणारे नागरिक आणि पोलीस यांना त्यांचे काम होईपर्यंत थांबण्यासाठी बैठकीची व्यवस्था व्हावी यासाठी अभ्यागत कक्ष उभारण्यात आला आहे.

निगडी येथील अभ्यागत कक्षामध्ये नागरिकांना बैठकीची व्यवस्था, पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती स्लाईड शो द्वारे दाखविण्याची व्यवस्था आहे. अभ्यागत कक्षामध्ये नागरिकांना त्यांचे काम होईपर्यंत वाचण्यासाठी वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.