Pune : कोकेन विक्रीसाठी घेऊन आलेल्या नायजेरियन व्यक्तीस सापळा रचून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा येथून कोकेन विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीस सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 96 हजार रुपये किमतीच्या कोकेनसह एकून दोन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोंढवा येथे ही कारवाई करण्यात आली. 

नादी ओडीनाका हेद्री (वय 34, रा. मॅजेस्टिक सोसायटी कोंढवा पुणे), असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला आरोपी कोकेन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून नादी याला अटक केली. त्याच्याकडून १) १६ ग्रॅम कोकेन किंमत रुपये ९६०००/- २) ३ मोबाईल फोन किंमत रुपये ११०००/- ३) ब्लॅक एक्टिवा किंमत रुपये २५०००/- ४) रोख रक्कम रुपये ७५०००/- ५) पासपोर्ट असा एकूण २०७०००-/रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करीत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.