Lonavala : मावळ विधानसभेकरिता काँग्रेसकडून निखिल कविश्वर यांचा अर्ज

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभेची जागा  काँग्रेस पक्षाला मिळावी ही मागणी काँग्रेस पक्षाने कायम ठेवली असून मावळ विधानसभेकरिता पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे समन्वयक व लोणावळ्याचे नगरसेवक निखिल कविश्वर यांचा अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर ब्लाॅक काँग्रेसच्या बैठकीत कविश्वर यांच्या नावाची एकमुखी शिफारस करत काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे केली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, शहराध्यक्ष विलास बडेकर, बाबुभाई शेख, नगरसेवक सुधिर शिर्के, महेश ढमढेरे, पृथ्वीराज पाटील, सुनिल मोगरे, सुर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.