Nilam Gorhe: विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना व्हाट्सअप ग्रुप मधून कुणी काढलं? 

एमपीसी न्यूज :अभूतपूर्व बंडाळीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट. शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे देखील या दोन गटात विभागले गेले आहेत. या दोन गटातील संघर्ष ही आपल्याला मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. (Nilam Gorhe) सध्या उद्धव ठाकरे गटाचे नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करत आहेत. तर याच डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावाची सध्या पुण्यात चर्चा सुरू आहे. कारण कधीकाळी त्यांचाच शिष्य राहिलेल्या किरण साळी यांनी त्यांना व्हाट्सअप ग्रुप मधून रिमूव्ह केले.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे पुण्याच्या आहेत. पुण्याच्या राजकारणात त्या सक्रियही असतात. शिंदे गटाचे नेते आणि युवा सेनेचे सचिव म्हणून ज्यांची नियुक्त करण्यात आली आहे असे किरण साळी यांनी काही वर्षांपूर्वी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. या व्हाट्सअप ग्रुप मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह पुण्यातील शिवसेनेचे इतर नेते आणि पत्रकारांचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये अनेक जण राजकीय आणि सामाजिक विषयावर आपली मते मांडत असतात. मात्र या ग्रुप मधून अचानक नीलम गोऱ्हे काढून टाकण्यात आला आहे. किरण साळी यांनीच नीलम गोऱ्हे यांना ग्रुप मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Pune accident: भरधाव पीएमपीएमएलची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

किरण साळी हे एकेकाळी नीलम गोऱ्हे यांचे विश्वासू मानले जायचे. त्यांची राजकीय कारकीर्द देखील नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू झाली. मात्र शिवसेनेतील बंडखोरी नंतर किरण साळी शिंदे गटात सामील झाले. उदय सामंत यांचे विश्वासू म्हणून देखील ते ओळखले जातात. (Nilam Gorhe) त्यामुळे मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला गेला असल्याचा दिसून येते. त्यातूनच साळी यांनी नीलम गोऱ्हे यांना व्हाट्सअप ग्रुप मधून चक्क रिमूव्ह केलं. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील ही लढाई आता व्हाट्सअप ग्रुपपर्यंत येऊन पोहोचली असल्याचे दिसून येते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.