Pune News : निलेश घायवळ टोळीचा सदस्य गजाआड, वसईतुन घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार निलेश गायकवाड टोळीच्या सदस्याला सापळा रचून पकडले. मागील दोन वर्षांपासून तो खूनाच्या गुन्ह्यात फरार होता. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला वसई येथून सापळा रचून पकडले.

जयेश कृष्णा वाघ (वय 31) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी या कामगिरीवर असताना त्यांना निलेश घायवळ टोळीचा सदस्य व गेल्या दोन वर्षांपासून खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार आरोपी हा पालघर जिल्ह्यात वसई येथे आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला येथून सापळा रचून पकडले. त्याच्यावर 2019 मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर तो पसार झाला होता.

पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा व पथकातील नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.