Bhosari : अल्पवयीन मुलाकडून महागड्या नऊ सायकल जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून 1 लाख 12 हजार रुपये किमतीच्या महागड्या नऊ सायकल जप्त केल्या. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील एक चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. तर अन्य सायकलच्या मालकांबाबत भोसरी पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी आशिष गोपी यांना माहिती मिळाली की, एक अल्पवयीन मुलगा दररोज वेगवेगळ्या सायकल वापरतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने नऊ सायकल चोरल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 12 हजार रुपये किमतीच्या नऊ सायकल जप्त केल्या. त्यातील एक सायकल चोरीचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असून अन्य आठ सायकलबाबत भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, बाळासाहेब विधाते, सागर जाधव, संदीप जोशी, अनिकेत पाटोळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.