Vadgaon : कामशेतमधील नऊ महिन्यांचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह; मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12

Nine-month-old baby corona positive in Kamshet; The total number of patients in Maval is 12

एमपीसी न्यूज – सलग दोन दिवसाच्या ब्रेक नंतर काल खंडाळ्यात आणि आज, गुरूवारी कामशेत येथील नऊ महिन्याच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले. नवीन रूग्ण वाढल्यामुळे तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 12 झाली आहे. 

गेल्या 22 दिवसांमध्ये मावळात शहरी भागात 5 व ग्रामीण भागात 9 अशा एकूण 14 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 मावळातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

आज (गुरुवार ) कामशेत येथील नऊ महिन्यांच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  कामशेत येथील राहणा-या एका  कुटुंबातील नऊ महिन्याचे बाळ आजारी असल्याने त्याला रूग्णालयात नेण्यात आले होते.

त्या बाळाला कावीळ झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्याला काल पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.

आता कामशेत येथील रुग्णाच्या कुटुंबातील  हाय रिस्क संपर्कातील 14 जणांना सुगी पश्चात केंद्र तळेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून लो रिस्क संपर्कातील 11 सदस्यांना  होम क्वारांटाइन करण्यात आल्याचे तहसीलदार बर्गे यांनी सांगितले.

कंटेन्मेट झोन म्हणून पूर्वेकडील शिक्षक सोसायटी ते गुलाब राणे यांचे घर, तर पश्चिमेकडील दत्त काॅलनी ते संजय पडवकर यांचे घर, दक्षिणेला पोलीस स्टेशन ते सहारा काॅलनी, उत्तरेला नाणे रोड, रेल्वे गेट ते बाळकृष्ण जिजाबा शिंदे यांचे घर हया ठिकाणी करण्यात आला आहे. बफर झोनमध्ये कामशेत पुर्ण गाव, नाणे, खामशेत, कुसगाव खुर्द या गावांचा समावेश करण्यात आला आहे. असे बर्गे यांनी सांगितले.

तळेगावात 7 मे रोजी तालुक्यातील पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यापाठोपाठ 11 मे रोजी माळवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला. ते दोन्ही रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यानंतर 19 मे अहिरवडे, 20 मे नागाथली, 21 मे वेहेरगाव व चांदखेड या दोन ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

22 मेला तळेगावमध्ये एकजण तर 23 मेला पुन्हा चांदखेड येथे 4 रुग्ण आढळले तर 24 मे घोणशेत आणि 25 मे व 26 मे या दोन दिवस ब्रेक मिळाला आणि काल 27 मे खंडाळा येथील 74 वर्षीय व्यक्ती आढळून  आली आणि आज गुरूवारी नऊ महिन्यांच्या बाळाच्या रूपाने आढळला त्यामुळे रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 12  झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.