Dehu Contonment Corona Update : कॉन्टोन्मेंट हद्दीत आज नऊ रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – देहुरोड कॉन्टोन्मेंट हद्दीत आज नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाली नाही. 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हद्दीतील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 358 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 हजार 313 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हद्दीत सध्या 10 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सध्या तीन रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, सात रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. आज अखेर हद्दीतील 35 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आजवर डिस्चार्ज देण्यात आलेल्या सर्व रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.