Baramati Crime News : आत्महत्या प्रकरणात नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बारामती शहरातील व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विद्यमान नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांचा समावेश आहे. 

 

जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे, जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे देशमुख, संजय काटे, विकास धनके, मंगेश ओंबासे, प्रवीण गलिंबे, हनुमंत गवळी, संघर्ष गव्हाळे आणि सनी उर्फ सुनील काळे अशी आरोपींची नावे आहेत. यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रतीक प्रीतम शहा यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर नमूद केलेल्या आरोपींनी प्रीतम शहा यांनी व्याजापोटी त्यांचा राहता बंगला नावावर करून द्यावा यासाठी मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून प्रीतम शहा यांनी आत्महत्या केली होती. प्रीतम शहा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.