BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पेस्ट कंट्रोलच्या त्रासातून नऊ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून काही वेळाने घरात येऊन झोपलेल्या एकाच कुटूंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने उपचार करण्याकरीता दवाखान्यात दाखल केले. दरम्यान उपचारादरम्यान एका नऊ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. 24) मध्यरात्री सिंहगड येथील आनंदनगर मध्ये घडली.

सार्थक डोंगरे (वय 9, रा. सिंहगड ) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थकचे वडिल संदीप डोंगरे हे पेस्ट कंट्रोलची कामे करतात. घरामध्ये ढेकणांचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांनी घरात पेस्ट कंट्रोल केले होते. त्यानंतर ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह बाहेर पडले व रात्री उशीरा घरी येऊन झोपल्यानंतर मध्यरात्री त्या सर्वांनाच उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला त्यामुळे सकाळी त्यांना शेजारी आणि नातेवाईकांनी सिंहगड येथील खाजगी दवाखान्यात अॅडमिट केले. परंतु सार्थकची प्रकृती अधिक खालावल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला ससूनमध्ये अॅडमिट करण्यास सांगितेल.

सार्थक ससूनमध्ये नेऊन अॅडमिट केले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळेरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर सार्थकचे वडिल संदीप,आई आणि भाऊ साहील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.