Chinchwad News : नऊ वर्षांच्या चिमुरडीचा पुणे ते शिर्डी 211 किलोमीटर सायकल प्रवास

एमपीसी न्यूज – सृष्टी सतीश जगताप या नऊ वर्षांच्या चिमुरडीने पुणे ते शिर्डी असा 211 किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण केला आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून सायकल प्रवासाची आवड असलेली सृष्टी मूळची पुरंदर तालुक्यातील रहिवाशी असून चिंचवड मधील विद्या निकेतन स्कूल मध्ये चौथीच्या वर्गात शिकत आहे.

इंडो एथलेटिक्स सोसायटी यांच्या वतीने आयोजित भक्ती सायक्लोथॉन अंतर्गत सुष्टीने हा प्रवास पूर्ण केला. पुणे- शिवनेरी – नारायणगांव – संगमनेर – शिर्डी असा 211 किलोमीटरचा हा सायकल प्रवास होता. अवघ्या 9 वर्षांच्या सृष्टीचा यासह एक हजार किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण झाला आहे.

सृष्टीला चौथ्या वर्षापासुन तिला ट्रेकिंग आणि सायकल चालवण्याचे वेड लागले. वयाच्या 5 व्या वर्षी तिने महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई, वासोटा आणि सांधण दरी अशा अवघड चढाई केल्या आहेत. सृष्टीने आतापर्यंत कोराई गड, वासोटा, पुरंदर, सिंहगड, जिवधन, नाणे घाट, चावण गड, ढाकोबा, सज्जनगड, दर्या घाट, प्रतापगड, तिकोणा, रायगड, विसापूर, वैराटगड, रायरेश्वर, शिवनेरी, दौलताबाद अशा किल्ल्यांची चढाई देखील पूर्ण केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.