Pimpri News : निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात होणार

0

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचा 54 वा वार्षिक निरंकारी संत समागम 26,27 व 28  फेब्रुवारी 2021 रोजी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही. सरकारने कोविड-19 च्या संदर्भात जारी केलेल्या दिशा-निर्देशांना अनुसरुन समागमाचे आयोजन व्हर्च्युअल रूपात करण्यात आले आहे.

मिशनच्या सेवादारांकडून मागील दीड महिन्यापासून या संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मोठ्या भक्तीभावाने व समर्पणाने संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर, मुंबई येथे केली जात आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात समागमात भाग घेणारे वक्ता, गीतकार, गायक, कवि, संगीतकार तसेच वादक यांनी अगोदरच या भवनमध्ये येऊन आपल्या प्रस्तुती सादर केलेल्या असून व्हर्च्युअल रूपात प्रसारण करण्यासाठी त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातील तसेच जवळपासच्या राज्यातील आणि देश-विदेशातील कित्येक वक्त्यांनी या समागमामध्ये भाग घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

समागमाच्या पूर्वतयारी दरम्यान कोविड-19 संदर्भात सरकारकडून देण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंग, मास्क परिधान करणे (दोन गजाचे अंतर, मास्क घालणे जरुर), सॅनिटाईजेशन इत्यादि काळजी घेण्याबरोबरच समागम सेवांमध्ये संलग्न आणि कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिनिधींची कोविड (RT-PCR) चाचणीही करण्यात आली जेणेकरुन सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे.

मिशनच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे, की यावर्षी 54 वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. निरंकार प्रभुच्या इच्छेला सर्वोपरी मानत हर्षोल्लासाने भक्तगण याचा स्वीकार करत आहेत. संपूर्ण समागमाचे व्हर्च्युअल प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर 26,27 व 28 फेब्रुवारी रोजी प्रस्तुत करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.