Pune : वनस्थळीच्या संस्थापिका निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, वनस्थळीच्या संस्थापिका आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 86 वर्षाच्या होत्या. वैकुंठ स्मशानभूमी येथे आज रात्री साडेदहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

निर्मलाताई यांचा जन्म ८ जानेवारी १९३३ रोजी बडोदा येथे.  १९५७ यावर्षी झाला. त्यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीतून कामाला सुरुवात केली. निर्मला पुरंदरे या प्रसिद्ध माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांच्या भगिनी होत्या. या साप्ताहिकाच्या संपादन विभागात त्यांनी २० वर्ष काम केले होते. निर्मला पुरंदरे यांनी वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी मागील ५० वर्षांपासून काम केले आहे.

वनस्थळी केंद्रामुळे भागातील अल्पशिक्षित महिलांच्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षणाची त्यांनी सोय केली. त्यातून राज्यभर हजारो सेविका आणि बालवाड्यांचे जाळे विणले. फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनाची स्थापना केली. खेडेगावातली पहिली बालवाडी त्यांनी स्थापन केली. शाळाबाह्य तरुणांसाठी त्यांनी सुतारकाम, प्लम्बिंग सारख्या कामांच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठी त्या अनेक उपक्रमाचे आयोजन करत असत. त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.