Nisarga Cyclone Effect: पुण्यात 43 मिलीमीटर पावसाची नोंद तर कमाल तापमानात सरारीपेक्षा 11.6 टक्क्यांची घट

Nisarga Cyclone Effect: Pune receives 43 mm of rainfall, maximum temperature drops 11.6 per cent below normal

एमपीसी न्यूज – निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुणे शहरात आज (गुरुवार) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत एकूण 43.1  मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबरच शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. काल शहरात 23.7 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. ते सरासरीपेक्षा तब्बल 11.6 अंश सेल्सियसने कमी आहे.

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटकाचा काही भाग, कोमोरीनचा व नैऋत्य बंगालच्या उपसागराचा आणखी
काही भागात, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा बहुतांश भागात व मध्य पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात झाली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात असलेले तीव्र चक्रीवादळात रुपांतर कमी (न्यून) दाबात झाले असून ते आता उत्तर पश्‍चिम विदर्भ व लगतच्या मध्य प्रदेशावर आहे, असे पुणे वेधशाळेच्या दैनंदिन प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पुणे शहरात 43.1 मि. मी., लोहगाव येथे 31.4 मि. मी. तर पाषाण येथे 44 मि. मी. पावसाची नोंद झाली. मुंबईत कुलाबा येथे 50 मि. मी., सांताक्रूझ येथे 24.8 मि. मी. तर गोव्यात पणजी येथे 26.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यात कमाल तापमान 23.7 अंशांपर्यंत खाली घसरले होते. ते सरासरीपेक्षा 11.6 अंश सेल्सियसने कमी होते. लोहगाव येथे 24.2 इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. ते सरासरीपेक्षा 9.8 अंश सेल्सियसने कमी होते. मुंबईत कुलाबा येथे 26.4 अंश सेल्सियस व सांताक्रूझ येथे 26.8 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. ते सरासरीपेक्षा अनुक्रमे 7.3 व 6.8 अंश सेल्सियसने कमी होते.

हवामान अंदाज

शुक्रवार, पाच जून – कमाल तापमान 26 तर किमान तापमान 23 अंश सेल्सियसच्या आसपास राहील. शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

शनिवार, सहा जून – कमाल तापमान 29 तर किमान तापमान 26 अंश सेल्सियसच्या आसपास राहील. शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.